महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही; बाळासाहेब थोरातांची सावरासावर

Balasaheb Thorat - Maharastra Today

मुंबई : गुरुवारी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या अनलॉकच्या घोषणेमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. अनलॉकच्या घोषणेमुळे झालेल्या या गोंधळावर काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारनं घेतलेल्या अनलॉकच्या यू-टर्नवर थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये कसलाही विसंवाद नसल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांनी झालेल्या गोंधळानंतर आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसचे नेते- मंत्री हे वरिष्ठ आहेत. त्यांना अनुभवदेखील आहे. त्यांच्याबाबत काही विसंवाद असेल तर मुख्यमंत्री, मी आणि काँग्रेसचे मंत्री आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि संवाद वाढवू. सरकारमध्ये कसलाही विसंवाद नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button