काँग्रेसशिवाय सरकार नाही, नाना पटोलेंना संजय राऊतांनी दिले उत्तर म्हणाले…

Sanjay Raut replied to Nana Patole

मुंबई : एका वृत्त समूहाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले होते की, सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले – काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका नाना पटोले यांना का यावी?

ही बातमी पण वाचा:- पदोन्नतीच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारमध्ये मतभेद ; ‘या’ काँग्रेस मंत्र्याचा आघाडीला  इशारा  

शंका आली कशी ? संजय राऊत

नाना पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणालेत – काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका नाना पटोले यांना का यावी? हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी सुरुवातीपासूनच आमच्या चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धव किंवा अन्य नेते असतील…त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीने, सहकार्यानेच चालले आहे. याचे विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेलं नाही.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी सोबत येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र, सरकारमधील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन मतांतर असून बरेचदा एकमेकांबद्दल उघडपणे नाराजी जाहीर करण्यात येते. सरकारमधील काँग्रेसचे स्थान यावरुन विरोधक अनेकदा महाविकास आघाडीवर टीका करतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातही अनेकदा शाब्दिक चकमकी होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button