औरंगाबादेत महाविकास आघाडीचा प्रयोग नाही; काँग्रेसकडून स्वबळाचा नारा

Amit Deshmukh & Mahavikas Aghadi.jpg

औरंगाबाद :- राज्यात शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन केली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताही मिळवली. मात्र सत्तेतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने आगामी औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी यासंदर्भात माहिती दिली.

महाविकास आघाडीतील पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिल्यापासून या स्वतंत्रपणे लढतात. त्यामुळे काँग्रेस औरंगाबाद महानगरपालिकेची आगामी निवडणूकही स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचाही पक्षाने निवडणूक स्वबळावर लढावी, असा आग्रह आहे. आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करणार आहोत. ठरवले आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने परिस्थिती सामान्य होऊ शकते. यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल.

दरम्यान, आता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आगामी काळात महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रपणे लढवणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरिष्ठ नेत्यांमधील समन्वयामुळे आतापर्यंत महाविकास आघाडीचे गाडे सुरळीत चालले आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्यास नवे वाद निर्माण होऊ शकतात. याशिवाय, गेल्या काही काळातील भाजपची वाढती ताकद पाहता मुंबई, नवी मुंबई, ठाणे या महानगरपालिकांमधील सत्ता कायम राखण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER