ममता बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे नाहीत, तो अपघात : निवडणूक आयोग

Mamta banerjee - Election Commision

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष्या ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे जोरदार राजकारण तापलं आहे. पण ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि अन्य दोन विशेष निवडणूक अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालावरुन निवडणूक आयोगाने सांगितले की, ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापत ही कुठल्याही हल्ल्यातून झाली नाही.

अहवालानुसार ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये कुठल्याही प्रकारचा हल्ला करण्यात आलेला नाही. त्यांना झालेली दुखापत ही छोट्याशा अपघातामुळे झाल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. स्पेशल ऑब्जर्व्हर अजय नायक यांनी दिलेल्या अहवालानुसार निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. हा अहवाल शनिवारी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. यापूर्वी देण्यात आलेल्या अहवालावर निवडणूक आयोग असमाधानी होतं. त्या अहवालात ममता बॅनर्जी यांना दुखापत नेकमी कोणत्या कारणामुळे झाली, हेच सांगितलं गेलं नव्हतं. त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत एक सविस्तर अहवाल मागवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER