ठाकरे सरकार १० वर्षे टिकेल यात शंका नाही, पवारांचा विरोधकांना टोला

CM Uddhav Thackeray - Sharad Pawar

मुंबई : अनेक मुद्द्यांवरून विरोधक सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत. हे सरकार तीन पक्षांचे असून, केव्हाही कोसळेल असे भाकीत विरोधकांकडून होत आहे. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो, राज्यातील ठाकरे सरकार ५ नाही तर १० वर्षे टिकेल. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे आहोत, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. ते आज तुळजापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर वाद निर्माण झाला आहे. खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यपालांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्याकडे एक म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार, त्यामुळे ही म्हण इथे लागू होत आहे की नाही ते पाहावे लागेल. पण राज्यपाल हे शहाणे आहे, त्यामुळे हा शब्द योग्य आहे की नाही, ते मला माहिती नाही, त्यामुळे ‘राज्यपालांनी आता त्या पदावर राहावे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे’, अशी गुगली शरद पवार यांनी टाकली.

राज्यपालांनी तशी भाषा वापरायला नको होती. मी आजपर्यंत अनेक राज्यपाल पाहिले. सत्तेत असताना अनेक राज्यपालांशी संबंधही आला. पण, असे भाष्य करण्याचे धाडस कुणी केले नाही. राज्यपाल हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ही प्रतिष्ठा राखायला हवी, राज्यपालपदावर आता त्यांना राहायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, असं सूचक विधान पवार यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : जलयुक्त शिवाराची चौकशी लावली म्हणून अजित पवारांमागे ‘ईडी’ लावली म्हणणे योग्य नाही – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER