ठोकशाही आणि मोगलाई यात काहीच फरक नाही; चंद्रकांत पाटलांचे आव्हाडांना खडेबोल

Jitendra Awhad - Chandrakant Patil

मुंबई : जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर बोलावून तरुणाला मारहाण केल्याचा भाजपाने आधीच निषेध नोंदवला आहे. मात्र आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या आव्हाड यांनी या लोकशाहीत दाखवलेली ठोकशाही अत्यंत निंदनीय. नागरिकाने लिखाणातून व्यक्त केलेल्या त्याच्या विचारांची दखल कायद्याच्या चौकटीत राहूनच घ्यायला हवी. अशी ठोकशाही आणि मोगलाई यात काही फरक नाही. मी भाजपाच्यावतीने या कृत्त्याचा निषेध व्यक्त करतो.

जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा ‘संविधानवादा’चा बुरखा फाटला; मनसे नेत्याचा विरोध

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका तरुणाने गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी बंगल्यावर नेऊन त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप त्याने केला. तर, माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटायला सुरुवात झाली असून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे . भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करा, अशी मागणी केली आहे.