कोणतीही ‘डील’ नाही; देशहितासाठी केला भाजपात प्रवेश – जितीन प्रसाद

Jitin Prasad - in BJP - Maharashtra Today

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशमधील काँग्रेसचे मोठे नेते जितीन प्रसाद यांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. प्रसाद म्हणालेत – कोणतीही ‘डील’ करून नाही तर देशहितासाठी मी भाजपामध्ये आलो आहे. (jitin prasad says that i joined BJP for national interest) एका मुलाखतीत प्रसाद म्हणालेत की – भाजपा देशहित आणि पुढील पिढीसाठी काम करत आहे. म्हणून मी या देशहिताच्या कार्यात सहभागी झालो आहे. कोणत्याही पदासाठी किंवा स्वार्थासाठी भाजपात प्रवेश केला नाही. काँग्रेस पक्ष जनतेपासून दूर गेला आहे. जनतेच्या अपेक्षेनुसार काँग्रेस काम करत नाही. मी ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो, तिथे काँग्रेसला काहीच महत्त्व राहिलेले नाही.

काँग्रेस दिशाहीन
काँग्रेस पक्षात नेतृत्वबदलाची गरज आहे. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. अनेकदा याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझे कोणीच ऐकून घेतले नाही. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय कठीण होता. आता भाजपमध्ये आलो आहे. पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडेन.

टीका करण्यास प्रत्येकाला स्वातंत्र्य
जितीन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. यावर बोलताना जितीन प्रसाद म्हणाले की, प्रत्येकाला टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही. प्रत्येकाची टीका प्रसाद म्हणून स्वीकारतो. ज्यांची विचारसरणी संकुचित आहे, ती तशीच राहणार. मी घेतलेला निर्णय योग्य असून, तो देशहिताचा ठरू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button