नाथाभाऊंकडून राष्ट्रवादीत येण्याची कुठलीही जबरदस्ती नाही, रक्षा खडसेंचे स्पष्टीकरण

जळगाव :- राज्याचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सुनबाई व भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली आहे. यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला असला तरी रक्षा खडसे यांनी मात्र आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यम परस्पर काहीही बातम्या देत असतात. नाथाभाऊ यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतेवेळी माझ्याशी चर्चा केली होती. मला त्यांनी भाजपमध्येच काम करण्याची सूचना केली आहे. राष्ट्रवादी येण्यासाठी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची मला जबरदस्ती नाही. आम्ही परिवार म्हणून एकत्र राहत असलो तरी जेव्हापासून दोघांचे पक्ष बदलले तेव्हापासून आम्ही दोघेही पक्षवाढीसाठी काम करीत असल्याच त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रक्षा खडसे यांनी सांगितले की, मला राजकारणात बाबांनी (नाथाभाऊ) यांनी आणले. मला दहा वर्षे राजकारणात नाथाभाऊ यांनी खूप काही शिकवले आहे. मला कुठेही अडचण आली तरी आजही नाथाभाऊ मला मदत करतात. भाजपमध्ये असताना देखील नाथाभाऊंचे सर्वपक्षीय नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध राहिले आहेत. अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. ते तोडता येत नाहीत. त्यांच्याशी बांधील असलेला कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्याचे ते काम करतात. आज देशात अनेक उदाहरण आहेत की, एकाच घरात दोन-तीन पक्ष आहेत. त्यामुळे आम्ही एकाच घरात खडसे परिवार राहत असलो तरी काम करताना काहीच अडचण येत नाही, असे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button