मध्यप्रदेशात पूर्णतः लॉकडाऊन नाही; शिवराजसिंग चौहान यांचा निर्णय

shivraj singh chouhan

मध्य प्रदेश :  मध्यप्रदेशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन लावल्यास सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे मध्यप्रदेशात संपूर्ण लॉकडाऊन हा पर्याय नाही. मात्र, मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लादले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ANI शी बोलताना मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान म्हणाले की, “राज्यात ऑक्सिजनची कमतरता नाही. चार  हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध  असून पाच  हजार आज दाखल होतील.

आम्ही राज्यभर टीका उत्सव साजरा करीत आहोत. मध्यप्रदेशला लॉकडाऊनचा सामना करावा लागणार नाही. सध्या मध्यप्रदेशसह अनेक शहरांमध्ये वीकेंड लॉकडाऊन आहे.” यापूर्वी शिवराजसिंग चौहान यांनी शनिवारी विषाणूची वाढती प्रकरणे लक्षात घेता राज्यात महिन्याच्या अखेरीस उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एक लाखावर पोहचण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र, शनिवारी विषाणूंमुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३२ हजार ७०७ वर पोहचली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौहान म्हणाले की, “राज्य सरकारदेखील व्हेंटिलेटरची व्यवस्था करीत आहे. लवकरच केंद्राकडून ३५० व्हेंटिलेटर मिळतील. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना अनावश्यक  घराबाहेर निघणे टाळण्याचे आवाहन केले आहे. रुग्णांसाठी सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये ६० टक्के आणि खासगी रुग्णालयात ४७ टक्के बेड्स रिक्त आहेत.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button