राज्यात 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, आज-उद्या मुख्यमंत्री ठाकरे घोषणा करणार : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat - Maharastra Today

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील अनेक कोरोना केंद्रांवर बेडची कमतरता जाणवत आहे. त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. एकंदरीत अशी परिस्थिती असताना मुंबई महापालिकेने (Mumbai Mahanagarpalika) रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा धक्कादायक आरोप मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नगरसेवकाकडून केला गेला आहे.

मुंबईतील भाजप नेते विनोद मिश्रा यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहून आरोपांबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यांनी आपल्या आरोपात म्हटलं की, ‘रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यात मोठा घोटाळा करण्यात येत आहे. राज्य सरकारची संस्था असणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटने ९ एप्रिल रोजी ५७ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी केली आहे. यावेळी त्यांनी ६६५ रुपये ८४ पैसे प्रतिइंजेक्शन दराने (Remedesivir injection) रेमडेसिवीरची खरेदी केली आहे.

असं असताना, बीएमसीने तेच इंजेक्शन ७ एप्रिल २०२१ रोजी १,५६८ रुपये प्रतिइंजेक्शन दराने खरेदी केले, असा आरोप मुंबई भाजपचे नेते विनोद मिश्रा यांनी केला आहे. यावेळी बीएमसीनं दोन लाख इंजेक्शनची खरेदी केली आहे. विनोद मिश्रा यांनी महापालिकेला पत्र लिहून याबाबत उत्तरही मागितलं आहे. त्यांच्या गंभीर आरोपानंतर पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button