उमरा यात्रेसंदर्भात हज समितीमार्फत कोणतीही कार्यवाही नाही

Haj Committee Umrah Yatra

मुंबई : महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत उमरा यात्रेसंदर्भात कोणतीही कार्यवाही केली जात नाही. हज समितीच्या नावाचा वापर करून कोणी उमरा यात्रेसाठी आर्थिक व्यवहार करीत असेल तर त्याची माहिती हज समितीला त्वरित कळविण्यात यावी, असे समितीच्या कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.

हज यात्रेचा कालावधी सोडून इतर कालावधीत यात्रेकरु उमरा यात्रेसाठी मक्का, मदीना येथे जातात. या उमरा यात्रेची कोणतीही व्यवस्था हज समितीमार्फत केली जात नाही, असे समितीने कळविले आहे. महाराष्ट्र राज्य हज समिती ही महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिपत्याखालील स्वायत्त संस्था आहे. या समितीचे कार्य हज अधिनियम 2002 अंतर्गत चालते.

या समितीमार्फत यात्रेकरुंना फक्त हज यात्रेस पाठविण्यात येते. समितीमार्फत उमरा यात्रेसंदर्भात कोणतीही कार्यवाही केली जात नाही. पण हज समितीच्या नावाचा वापर करून उमरा यात्रेसाठी कोणी आर्थिक व्यवहार करीत असेल तर त्याची माहिती हज समितीला रुम नं. 6, 7, व 8, तळ मजला, साबू सिद्दीक मुसाफिरखाना, एल.टी. मार्ग, मुंबई या पत्त्यावर किंवा टेलिफोन क्रमांक 022-22626786 /22620708 किंवा [email protected] या ईमेलवर त्वरित द्यावी. तसेच अशा व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करू नये. अशा प्रकारे व्यवहार केला गेल्यास ही व्यक्ती स्वत: जबाबदार राहील. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य हज समितीची कोणतीही जबाबदारी राहणार नाही, असे कळविण्यात आले आहे.