‘मन की बात’ आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत; मनसेचा मोदी , उद्धव ठाकरेंना टोला

pm modi - Sandeep Deshpande - Uddhav Thackeray - Maharashtra Today

मुंबई :- देशात कोरोनाने थैमान घातले आहे . यापार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे . अनेक ठिकाणी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यामुळे राज्यातील नागरिक हवालदिल झाले आहे. या सर्व परिस्थितीवरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला .

देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही,” असा खोचक टोला संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) लगावला आहे.

दरम्यान राज्यात काल नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 10 हजारांनी जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्यात काल दिवसभरात 59 हजार 500 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोना रुग्ण आढळले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button