चांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज ठाकरे

Raj Thackeray & MNS

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे (MNS) जे उमेदवार विजयी झालेत त्यांना गावासाठी काहीतरी चांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, त्यांनी या संधीचा उपयोग करावा, असे म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

याबाबत राज ठाकरे यांनी ट्विट केले – ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत, त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगले करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER