लसींचा स्टॉक आहे! पण तो पुढच्या टप्प्यासाठी राखीव, महाविकास आघाडी सरकारची कबुली

Vaccine - Uddhav Thackeray - Maharastra Today
Vaccine - Uddhav Thackeray - Maharastra Today

पुणे : सध्या लस वाटपाच्या मुद्य्यावरुन सुरु असलेल्या राजकारणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. केंद्र सरकार योग्य प्रमाणात लस देत नसल्याने राज्यात तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप राज्य सरकार करत आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारकडे कोव्हॅक्सीनचे डोस असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या लसी न संपवता नव्या लशींची मागणी का करता असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान, मध्यंतरी कोव्हॅक्सिन दिलेले असल्याने त्यांचे पुढच्या टप्प्यातील लसीकरण करण्यासाठी या लसी शिल्लक ठेवण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण थांबवण्याची वेळ आली. राज्यातही अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाल्याने सांगण्यात येत आहे. आता या प्रश्नात आणखीनच नवी माहिती समोर आली आहे. राज्याकडे कोव्हिडशिल्डचा तुटवडा असला तरी प्रत्यक्षात कोव्हॅक्सिन उपलब्ध असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. मात्र राज्य सरकारने या लसी दुसऱ्या डोस साठी राखीव ठेवायचा आदेश जारी केला आहे. उपलब्ध आकडेवारी नुसार राज्यांत आत्ताही कोव्हॅक्सिनच्या काही लाख लसी उपलब्ध आहेत. मात्र ५ तारखेला काढलेल्या आदेशानुसार या संपुर्ण लसी दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या लसी शिल्लक असल्याने केंद्र सरकार नव्या लसी कशासाठी देणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

सरकारच्या आदेशानुसार लसीचा तुटवडा जाणवणाऱ्या पुण्यातच यापैकी ६७००० लसी शिल्लक आहेत. अडचणीच्या काळात या लसी वापरायच्या का असा सवाल अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. मात्र याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश देण्यात आलेला नाही. पण या सगळ्यामुळे हा लसीचा तुटवडा कृत्रिम की खरा असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button