आतापर्यंतचा इतिहास आहे, ज्यावेळी बळीराजा रस्त्यावर आला त्यावेळी कुठलचं सरकार टिकलेलं नाही : कॉंग्रेस

Rajiv Satav

नवी दिल्ली :- दिल्लीत तीन ते चार डिग्रीमध्येही शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर भाजप नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत. पहिले रावसाहेब दानवेंचे आंदोलनाला पाकीस्तान चीन युद्ध म्हणणे तर, आज विनय सहस्त्रबुद्धे यांनी त्यांच्या आजच्या लेखात श्रीमंत आणि प्रस्थापित शेतक-यांचे हे आंदोलन असल्याचे म्हणणे. याच आधारावर एबीपी माझाच्या प्रतिनिधीने कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांनी संवाद साधला. यावेळी राजीव सातव यांनी भाजप नेत्यांची वक्तव्य म्हणजे अज्ञानाचा भाग असल्याचे सांगत आतापर्यंतचा इतिहास आहे, ज्यावेळी बळीराजा रस्त्यावर आला त्यावेळी कुठलचं सरकार टिकलेलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

काय म्हणाले राजीव सातव –

ज्यांना शेतीमधलं काही समजत नाही. भाजपाचे नेते शेतक-यांसंदर्भात जे वक्तव्य करत आहेत ते शेतीविषयी अज्ञान दाखवते.

यूपीएच्या काळात शरद पवार देशाचे कृषीमंत्री होते. युपीएच्या काळात शेतक-यांना न्याय देण्याचा विषय झाला मग शेतक-यांची कर्जमाफी असेल, किंवा अन्य विषय योग्य रितीने हाताळले गेले. मात्र, मागच्या सहा वर्षात ना कृषीमंत्र्यांना शेतक-यांची जाण होती ना पंतप्रधानांनीही कधी शेतक-यांच्या बाजूने भूमिका कधी घेतल्याचे दिसले नाही. एवढेच नाही तर आताचे पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनीही कृषी साठी किंवा शेतक-यांसाठी कुठलीही भूमिका घेतल्याचे मला तरी आठवत नाही. त्यामुळे ज्या पक्षाचीच भूमिका शेतक-यांविरोधी आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची.

मात्र, तरीही शेतकरी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी राजधानीच्या दारात येऊन बसले आहेत. तीन ते चार डिग्रीत ते उघड्य़ावर आहेत. अनेक शेतक-यांना जीव गमवावा लागलेला आहे. त्यातच आता या आंदोलनात संपुर्ण देशातले शेतकरी एकत्र जमायला लागले आहेत.

त्यामुळे आतापर्यंत या देशाने पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा बळीराजा असा रस्त्यावर आला तेव्हा तेव्हा सरकारं पडली आहेत. त्यामुळे आता तरी या सरकारने शेतक-यांकडे पाहिलं पाहिजे. भाजपा नेत्यांना शेतीतलं काहीच कळत नाही. त्यामुळे ्शा पद्धतीचं मुक्ताफळं नेहमीचं यांच्याकडून उधळली जातात. फक्त मोठ्या मोठ्या उद्योगपतींनाच मदत करण्याचा अजेंडा मागच्या सहा वर्षात भाजपाचा राहिलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER