मॉडेल अ‍ॅक्ट आणि कृषी कायदा यात फरक आहे : नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई : समाजातील सेलिब्रिटींना कृषी कायद्याविषयी काहीच समजत नाही. नक्कीच कोणाच्यातरी दबावाखाली ही ट्विटस केली असावीत. अशी ट्विट करायला पाहिजे नव्हती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारलाही (PM Modi Govt) त्यांनी लक्ष्य केले आहे. कायद्यात बदल किंवा सुधारणा करायचे असेल तर सर्वांना विश्वासात घ्यावे. मॉडेल अ‍ॅक्ट आणि कृषी कायदा यात फरक आहे. पण मोदी याकडे दुर्लक्ष करत आहे. असा आरोप मलिक यांनी केला.

नारायण राणे (Narayan Rane) यांनी वीस वर्षे फासे फिरवण्याचा प्रयत्न केला. पण आजवर ते कधीच यशस्वी झाले नाही. तसेच फडणवीस यांनाही फासे पलटवणे जमणार नाही. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार २५ वर्षे टिकेल, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER