वन डे क्रिकेटमध्ये असा सामना झाला नव्हता कधी..!

Rahmanullah Gurbaz

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या शेकडो वन डे (One Day Cricket) सामन्यांपैकी गुरुवारचा अफगणिस्तान (Afghanistan) आणि आयर्लंडदरम्यानचा (Ireland) सामना अगदी वेगळा ठरला. अबूधाबी (Abudhabi) येथील हा सामना अफगणिस्तानने 16 धावांनी जिंकला आणि सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजच्या (Rahmanullah Gurbaz) 9 षटकारासह 127 धावांच्या शतकी खेळीने तो गाजला पण हा सामना वैशिष्ट्यपूर्ण ठरला तो दुसऱ्याच एका गोष्टीसाठी. ती म्हणजे वन डे इंटरनॅशनलच्या इतिहासातील हा पहिलाच असा सामना होता ज्यात पूर्ण 100 षटके खेळ झाला, ज्यात दोन्ही संघांच्या सर्वच्या सर्व 11 खेळाडूंनी म्हणजे एकूण 22 खेळाडूंनी फलंदाजी केली आणि प्रत्येकाने किमान एक तरी धाव केली.

अफगणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर 50 षटकांत 9 बाद 287 धावा केल्या. त्यांचा 10 व्या क्रमांकाचा फलंदाज मुजीब उर रहमान (1) आणि नवीन उल हक (2) हे नाबाद राहिले.याच्या उत्तरात आयर्लंडनेही पूर्ण 50 षटके खेळून काढतान 9 बाद 271 धावा केल्या. यांचाही 10 व्या क्रमांकाचा फलंदाज बॕरी मॕक्कार्थी (5) आणि 11 व्या क्रमांकाचा क्रेग यंग (12) हे नाबाद राहिले.

याप्रकारे या सामन्यात पूर्ण 50-50 षटके खेळही झाला आणि दोन्ही संघाच्या सर्व 11 खेळाडूंनी फलंदाजीसुध्दा केली. विशेष म्हणजे सर्व 22 फलंदाजांनी किमान एकतरी धाव केली. असा सामना आतापर्यंत झालेला नव्हता.

याच्या जवळपास असणारा दुसरा सामना म्हणजे 1993 मधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा मँचेस्टर येथील सामना. त्या सामन्यात आॕस्ट्रेलियाने 9 बाद 258 धावा केल्या होत्या तर इंग्लंडचा संघ एक चेंडू शिल्लक असताना 254 धावात बाद झाला होता. मात्र या सामन्यात पूर्ण षटके खेळ झाला नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER