कंगना कृतघ्न वागण्यामागे दोन कारणं असू शकतात…, धनंजय मुंडे

Dhananjay Munde & Kangana Ranaut

मुंबई : सुशांतसिह आत्महत्या चौकशी प्रकरणात कंगना रणौतची एन्ट्री राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ठरत आहे. तसेच, कंगनाचे मुंबई बद्दलचे वक्तव्य, मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर उपस्थित केलेले प्रश्न यामुळे कंगनावर अनेक स्तरातून टीका होत आहे.

आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते असे बोलल्या नंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि कंगनामध्ये शाब्दिक वार पाहायला मिळाले ते अद्याप थांबलेले नाही. कंगना रनौत (Kangana Ranaut) एवढ्यावरच थांबली नाही तर, मुंबई ही पाकव्यात काश्मिरसारखी वाटते असेही तीने म्हटले. मुंबईला भले बुरे म्हणणा-या कंगनाला बॉलिवूडकरांनीही चागलेच खडसावले.

एवढेच नाही तर, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही कंगनाला खडसावले आहे. तुमच्या सारख्या अनेकांना याच मुंबईने आसरा दिला आहे, ग्लॅमर-करिअर दिलंय. एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते. एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते,” अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER