कल्याणसारखे रस्ते अख्या महाराष्ट्रात कुठे नसतील ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला टोला

Jitendra Awhad-Shivsena

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) हे कल्याणच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी कल्याण सारखे रस्ते अवघ्या महाराष्ट्रात नसतील असं म्हणत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला.

कल्याण पश्चिममध्ये राष्ट्रवादीच्या वतीने क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्याच्या उद्घाटनासाठी जितेंद्र आव्हाड कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी कल्याणमधील रस्त्यांबाबत चिंता व्यक्त केली. ‘कल्याणमध्ये आल्यावर रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही, तरुणांनी काही तरी विचार केला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रात असे रस्ते कुठेही नसतील, असे वक्तव्य करीत त्यांनी कल्याण डोंबिवलीतील विकास कामांवर थेट प्रश्न उपस्थित केला .

विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर हे मंचावर उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेले अनेकवर्षे शिवसेना व भाजपाची सत्ता आहे आणि कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केल्याने शिवसेनेला टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत .


 

ही बातमी पण वाचा : शिवसेनेला राष्ट्रवादीची मदत, माजी महापौरांनी केला गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER