सुशिक्षित लोक अधिक असल्याने मतं नाही; भाजप आमदाराची कबुली

o.Rajagopala

दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. मोदी सरकारच्या मोदींच्या नेतृत्वात उतरलेला भाजप पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज आहे. केरळमध्ये ६ एप्रिलला मतदान होणार आहे. केरळमधून भाजपला खूप अपेक्षा आहेत. मात्र, भाजपच्या या अपेक्षांना पक्षातील नेतेने सुरुंग लावले आहे.

केरळमधील भाजप नेते आणि आमदार ओ. राजगोपाल यांनी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत विधान केले आहे. यांचे विधान पक्षासाठी नुकसानदायी ठरू शकते. राजगोपाल म्हणाले की, “केरळ इतर राज्यांपेक्षा वेगळे राज्य आहे. येथील सुशिक्षित लोकांचे प्रमाण अधिक असल्यामुळे भाजपला लोक मतदान करत नाही. केरळ येथील साक्षरतेचे प्रमाण ९० टक्के आहे. राज्यातील लोक तार्किक आहेत. दुसरे म्हणजे येथील ५५ टक्के लोक हिंदू तर ४५ टक्के लोक अल्पसंख्यांक आहे. त्यामुळे केरळची तुलना इतर राज्यांसोबत होऊ शकत नाही. तरी येथे चांगले काम करत असल्याचे राजगोपाल यांनी नमूद केले.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER