ऑक्टोबर हिटची चाहूल

There are big changes in October environment.jpg

कोल्हापूर :- परतीच्या पावसाला (Rain) झालेली सुरुवात, सरासरी पाच अंशांनी  वाढलेला पारा, दूषित पाण्यामुळे सुरू असलेला साथींच्या रोगांचा फैलाव, वातावरणीय बदलामुळे वाढलेला डासांचा डंख असे ऋतू संक्रमणाच्या वेळी असणाऱ्या वातावरणाचा अनुभव कोल्हापूकरांना येत आहे. दिवसा वाढलेला उष्मा तर रात्री थंड हवा अशा द्विधा वातावरणाचा कोल्हापूकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यातच कोरोना संसर्गाचा धोकाही कायम असल्याने काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

मे-जून, सप्टेंबर-ऑक्टोबर व जानेवारी-फेब्रुवारी हा साधारण ऋतू संक्रमणाचा कालावधी मानला जातो. या काळात वातावरणात मोठे बदल होत असतात. पावसाळा संपून हवेत गारठा वाढतो. कडक उन्हाळा संपून हवेत आर्द्रता वाढण्यास सुरुवात होते. तर आर्द्रता  कमी होऊन वातावरणात रुक्षपणा वाढीस लागतो. या काळास ऋतुसंक्रमण म्हणतात. गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. वाढलेला पारा नागरिकांना हैराण करीत आहे. दुपारच्या कडक उन्हापासून बचाव हाच उपाय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

ही बातमी पण वाचा : पावसाचा परतीचा प्रवास झाला सुरू 

वातावरणात झालेल्या या बदलामुळे अनेक आजारदेखील बळावलेत. दिवसा कडक ऊन, रात्रीचे थंड वातावरण असा वातावरणात विरोधाभास आहे. दिवसभर उकाडा सहन करणाऱ्या कोल्हापूरकरांना रात्री थंडीने दिलासा मिळत असला तरी त्यामुळे अनेक आजार बळावण्याचा धोका आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि डोळ्यांच्या साथीसह डेंग्यूचा आजार डोके वर काढू शकतो. कोरोना संसर्ग असल्याने बदललेल्या या वातावरणात आपली आणि आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.  तेव्हा जरा जपून राहा.

त्यामुळे आजारांची लक्षणं दिसताच दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. पुढील काही दिवस कोल्हापूरकांना घामाघूम व्हावं लागणार आहे. ऑक्टोबर हिटची सुरुवात आहे. दरम्यान, कमाल आणि किमान तापमानात दिवसात चार ते पाच अंशांनी वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER