इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत – निलेश राणे

Nilesh Rane

सिंधुदुर्ग :- अंमली पदार्थ पुरवठा प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’चा मालक रामकुमार तिवारी याला अटक केल्यानंतर आता एनसीबीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान यांना देखील अटक केली असून कोठडीची परवानगीही मिळवली आहे. यामुळे एकापाठोपाठ एक अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांच्या अडचणी वाढत आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर देखील त्यांच्याशी संबंधित एका महिलेने आरोप करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असतानाच नवाब मलिक यांच्या जावयाला देखील अंमली पदार्थांच्या कनेक्शनमध्ये अटक केली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंट मुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललय काय?? इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER