…मग २०२२ मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याला २०२१ मध्ये सरकारने परवानगी का दिली? आव्हाडांचा सवाल

Jitendra Awhad - PM Narendra Modi

मुंबई : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे . या संकटमय काळात आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यावरून राजकीय नेत्यांसह अनेकांनी टीकाही केली आहे . कुंभमेळ्यादरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कुंभमेळा प्रातिनिधिक स्वरूपात आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यावरून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

“कुंभमेळ्याचं आयोजन दर १२ वर्षांनंतर केलं जातं. यानुसार कुंभमेळा २०२२ मध्ये आयोजित झाला पाहिजे होता. असं असताना केंद्र आणि राज्य सरकारनं २०२१ मध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्याची परवानगी कशी दिली? आता त्यांनी मृत्यूंची आणि कोरोनाचा प्रसार झाल्याची जबाबदारी स्वीकारावी. ” असे आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रश्न उपस्थितीत केला आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्विट करत नेपाळचे पूर्वीचे राजे ज्ञानेंद्रवीर विक्रमशाह देव आणि राणी कोमल यांना कोरोनाची लागण झाली असल्याचंही म्हटलं. ते महाकुंभमेळ्याला उपस्थित होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button