पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचे कौतुक केले; पण फडणवीस टीका करताहेत, मग योग्य कोण? जयंत पाटलांचा सवाल

Maharashtra Today

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) यांच्याकडून नुकतेच महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा सामना करण्याबाबत राज्य सरकारचे कौतुक करण्यात आले होते. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) सतत टीका करीत आहेत .

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. या ट्विटला रिप्लाय देताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले . जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , देवेंद्र फडणवीसजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविड-१९  चा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

मला आशा आहे की, याची आपल्याला जाणीव असेल, अशी आठवण करून सणसणीत टोला लगावला. तसंच, आता मुख्य प्रश्न असा आहे की, योग्य कोण, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही? असा सवाल विचारत जयंत पाटलांनी आणखी एक टोला लगावला. ‘हा प्रयत्न हास्यास्पद आणि केविलवाणा’ ,असे पाटील म्हणाले .दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फोन केला होता. यावेळी त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत असताना राज्य सरकारने चांगल्या उपाययोजना केल्यात, असे म्हणत कौतुक केले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button