…तर पुन्हा दिल्लीत घुसून बॅरिकेट्स तोडावे लागेल’; टिकैत यांची आंदोलकांना चिथावणीखोर आवाहन!

Farmers Protest - Rakesh Tikait - Maharashtra Today

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) पारीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाला आता शंभर-सव्वाशे दिवस उलटून गेले आहेत. अद्यापही कृषी कायद्यांवर समाधानकारक तोडगा निघालेला नाही.

या दरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चिथावणीखोर आवाहन केले आहे. दिल्लीत पुन्हा घुसावे लागेल, पुन्हा बॅरिकेड्स तोडावे लागतील, असे राकेश टिकेत (Rakesh Tikait) यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. राकेश टिकैत सध्या कृषी कायद्यांविरोधात जनजागृतीसाठी विविध राज्यांमध्ये किसान महापंचायतींचे आयोजन करत आहेत.

२३ मार्च रोजी (मंगळवारी) जयपूरमध्ये किसान महापंचायतीमध्ये राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “केंद्र सरकार लोकांमध्ये जातीधर्माच्या आधारावर फूट पाडत आहेत. मात्र, आता अन्नदाता फुटणार नाही. तसेच, गरज पडल्यास तो संसदेमध्ये येऊन धान्य विकून दाखवेल. शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास सांगितले जाईल, तेव्हा त्यांनी त्या दिशेने कूच करावी.”

आंदोलनाबाबत इशारा करत राकेश टिकैत म्हणाले की, संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना आता जागे व्हावे लागेल. विशेष म्हणजे तरुणांनी आता पुढाकार घेऊन लढले पाहीजे. या देशात जय श्री राम आणि जय भीमच्या घोषणा एकत्र दिल्या जातील, तेव्हाच देश वाचेल.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER