…तर महिनाभरात कोरोनावर नियंत्रण मिळवू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची सर्वपक्षीय बैठक सुरू आहे. यावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊनची (Lockdown) वेळ आली आहे. निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही. आताच निर्णय घेतला तर महिनाभरात कोरोनावर (Corona) नियंत्रण मिळवू, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होताच मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचे सादरीकरण केले. राज्यातील रुग्ण, मृतांचा आकडा, औषधांचा उपलब्ध साठा, लसीकरणाची माहिती आणि संसर्गाचा धोका, आदी याबाबतची माहिती कुंटे यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. याबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, लोकांचे येणे-जाणे थांबले पाहिजे. कार्यालयाच्या वेळा बदलल्या पाहिजे. घरातूनच कामाचे नियोजन झाले पाहिजे. पीक अवर ही संकल्पनाही बदलली पाहिजे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button