…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही- मनसे

raju patil

मुंबई : सत्ताधारी ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार शिवाजी महाराजांचे नाव सांगून सत्ता भोगत आहेत. मात्र, गडकिल्ल्यांकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही.  गडकिल्ल्यांकडे  दुर्लक्ष करत महत्त्वाच्या  नसलेल्या गोष्टींना सरकारकडून जाणीवपूर्वक अधिक महत्त्व  दिले जात आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. राजू पाटील म्हणाले, “छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.

अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण ही जी शिवरायांची खरी स्मारकं आहेत ती जर आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही.” अशा शब्दांत राजू पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राजू पाटील (Raju Patil) म्हणाले, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गडकिल्ल्यांची देखरेख करण्यासाठी राज्य सरकारने एखादे स्वतंत्र मंडळ तयार करावे, अशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. तसेच, शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात बांधता येत नसेल तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधा.

महाराजांचा त्या किल्ल्यावर वावर होता हे सांगणारे अनेक पुरावे आहेत. तिथे त्यांचे राज्यातील एकमेव मंदिर आहे. मात्र सत्ताधारी राजकारणी लोकांच्या भावनेशी खेळत महाराजांच्या नावाने राजकारण करत आहेत. त्यापेक्षा किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी उभे राहा. स्मारके लोकसहभागातून झाली पाहिजे हे यापूर्वीदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्लू प्रिंटमधून मागणी केल्याचेही पाटील यांनी राज्य सरकारला सांगितले आहे.

प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेले भूस्खलन रोखण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानकडून निधी संकलन सुरू  आहे. या निधी संकलनाची माहिती मिळताच आमदार राजू पाटील यांनी पाच  लाखांची मदत केली (MNS MLA Raju Patil on fort development). छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पदस्पर्शाने पावन झालेले गडकिल्ले ढासळत असताना सरकार आणि पुरातत्त्व  खात्याचे त्याकडे लक्ष नाही.

मात्र, अनेक सामाजिक संस्था आणि संघटना ते वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत- अशी माहिती राजू पाटील यांनी दिली. तसेच, गडकिल्ल्यांच्या संरक्षणाकडे राज्य सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी राजू पाटील यांनी केली.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER