…मग आडनाव बॅनर्जी, ठाकरे असो किंवा पवार, ते आडवे करणारच : निलेश राणे

Nilesh Rane

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली . बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपावर घणाघाती हल्ला चढवला होता. यावरून भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी यावरून आता निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

तो व्हिडीओ पश्चिम बंगालमधील भाजपाच्या एका सभेचा असल्याचा दावाही राणे यांनी केला आहे. या व्हिडीओत लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सभा. एकदा लोकांनी ठरवले कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असू दे किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच. संजय राऊत हे बघून ठेवा. विसरू नका. अति तिथे माती होणारच, असे म्हणत राणे यांनी निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER