…तर सरकारी यंत्रणेवर मोक्का लावावा : निलेश राणे

Nilesh Rane

रत्नागिरी : कोरोनाची (Corona) परिस्थिती हाताबाहेर जाते आहे. निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकार आणि सरकारी यंत्रणेवर मोक्का लावावा, असे विधान भाजपचे (BJP) प्रदेश सचिव निलेश राणेंनी (Nilesh Rane) केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे आरोग्य व्यवस्था नाही. तुम्ही फक्त लसींचा पाठलाग करत आहे. राज्यकर्त्यांना लोकांचे काही देणे-घेणे नाही, लोक मेले तरी चालतील, हा जाणूनबुजून केलेला गुन्हा आहे. त्यामुळे यांच्यावर मोक्का लावला पाहिजे, अशी मागणी निलेश राणेंनी केला आहे.

लोक मरताहेत याला जबाबदार कोण?
निलेश राणे म्हणाले की, जेव्हा ऑर्गनाईझ क्राईम होते तेव्हा मोक्का कायदा लावला जातो. हे ऑर्गनाईझ क्राईम नाही का, लोकांना ठरवून मारले जात आहे. हकनाक लोक मरताहेत याला जबाबदार कोण, असा उद्विग्न प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

परिस्थिती नियंत्रणात आल्यास कोर्टात जनहित याचिका दाखल करणार
“मानवी जीवनाकडे दुर्लक्ष कायद्यांतर्गत मी कोर्टात जाणार आहे, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर कोर्टात जनहित याचिका दाखल करणार. लॉकडाऊन (Lockdown) करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) महाराष्ट्राला भिकेला लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवडीचा विषय म्हणजे लॉकडाऊन, ते बेरोजगारीवर काही बोलत नाहीत, व्यापारी रस्त्यावर आहेत. रिक्षा, बस, टॅक्सी चालू आहेत, पण गार्डन बंद, ऑफिसेस बंद, दुकाने बंद आहेत. मग लोक जाणार कुठे? असाही प्रश्नही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

अजितदादांनी पुण्याची वाट लावली
निलेश राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही (Ajit Pawar) सडकून टीका केली आहे. अजित पवार यांनी सर्वांत जास्त वाट पुण्याची लावली. यांचे बोलणे काय आणि वागणे काय, एरवी तोंडावरचे मास्क न काढणारे अजित पवार पंढरपुरात जाऊन भरगच्च सभा घेतात. काल सांगतात लॉकडाऊन लावावा लागेल, लाज वाटत नाही का तुम्हाला? अशा शब्दात निलेश राणेंनी अजित पवार यांना फटकारले. अनिल परब यांना वाचवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक होती, आता ठाकरे सरकारला कोरोनाचे कारण मिळाले आहे, असा निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button