…तर कोरोनाचे जंतू फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते, शिवसेना आमदाराची जीभ घसरली

Sanjay Gaikwad - Devendra Fadnavis - Maharastra Today
Sanjay Gaikwad - Devendra Fadnavis - Maharastra Today

बुलढाणा : मला जर कोरोनाचे (Corona) विषाणू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या तोंडात कोंबले असते, असे खळबळजनक विधान शिवसेनेचे (Shivsena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले आहे. संकटाच्या काळात फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला. ते शनिवारी बुलडाण्यात एका सभेत बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. भरसभेत संजय गायकवाड यांची जीभ घसरली. त्यामुळे आता यावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे

सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र विरोधी पक्ष यावेळी कोरोनाच्या लढ्यात उतरायचे सोडून राजकारण करत आहे, असा आरोप करत त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला. केंद्रातील भाजपने राज्यसरकारला मदत करण्याचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत उपलब्ध करुन देण्यात आले. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला संजय गायकवाडांनी लगावला.

जर का माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मत कोण देणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button