‘…तर अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असती’; दरेकरांचा राऊतांना टोला

Sanjay Raut - Pravin Darekar

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनामध्ये लिहलेल्या रोखठोकमधील मजकुरावर प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी चांगलीच टीका केली आहे. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे, असे वक्तव्य आज संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोकमध्ये केले होते.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज दिले. मला वाटते संजय राऊत यांनी फुकटचा सल्ला उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामुळे महाराष्ट्राला गटापेक्षा दुर्दैवी अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल.” अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली. “अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची संजय राऊत यांनी उजळणी करण्याची आवश्यकता आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील १० वर्षात जी प्रगती करू शकले नाहीत, ती प्रगती मोदींनी दीडपट गतीने गेल्या ५ वर्षांमध्ये केली. मोदींनी देश अर्थव्यवस्थेत प्रगतीकडे नेला, याचे भान संजय राऊतांना नाही. किंवा ते समजून न उमजल्यासारखे करत आहेत.” असे प्रविण दरेकर म्हणाले. तसेच राऊत केंद्रीय आणि देशपातळीवरचे नेते असल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी त्यांना चिंता करावीशी वाटत नाही, असा आरोपसुद्धा दरेकर यांनी राऊतांवर केला.

राऊत रोखठोकमध्ये काय म्हणाले?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या सदरातून मोदींवर हल्ला चढवला. कोरोना महामारीने देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज देशातील ६० टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे, असे मत राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button