… तर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात येऊ शकते – शरद पवार

Sharad Pawar - NCP

अहमदनगर :- कोरोना लसीकरणाचा (Coronavirus Vaccination) पहिला टप्पा राज्यात सुरू आहे. मात्र, इतक्यातच सर्वांपर्यंत लस पोहचायाला मोठा अवधी लागणार आहे. हे सत्य जाणून नागरिकांनी अजुनही सतर्कता बाळगावी यासाठी सरकार पुर्णपणे प्रयत्न करत आहेत.

आता राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही नागरिकांना सतर्कता बालगण्याचे आवाहन केले आहे. कोरोना अजून संपलेला नाही. कोरोनाचे नियम अजून लागू आहेत. मात्र, लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात येऊ शकते. असे शरद पवार यांनी सांगितले. ते अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

पवार म्हणाले, ‘दो गज दुरी, मास्क है जरूरी’ अशी जागृती केली जाते. मात्र, कार्यक्रमात तर सर्वजण खांद्याला खांदे लावून बसलेले आहेत. अनेकांच्या तोंडाला मास्कही नाहीत. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे नगर जिल्ह्यातील प्रमाण हे देशातील प्रमाणापेक्षा चांगले असून, ते ९७ टक्के इतके आहे. ही गोष्ट चांगली असली, तरी कोरोना अजून संपलेला नाही, हे लोकांनी ध्यानी घेतले पाहिजे. युरोपमध्येही परिस्थिती गंभीर आहे. इंग्लंडमध्ये ३५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. असेही पवार यांनी सांगितले व कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले आहे.

यावेळी कॉंग्रेसचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी उपस्थित होते.

तर, कोरोनाच्या काळात शहरातील सर्वच डॉक्टरांचे योगदान चांगले होते. म्हणूनच कोरोनावर मात करू शकलो. मात्र, अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जीवनदायिनी योजना लागू केल्यानंतर रुग्णांकडून पैसे मागू नका. रुग्णांना मोफत सेवा द्या. त्यांचे आशीर्वाद हॉस्पिटलचे मजले वाढविण्यासाठी कामी येतील, अशी अपेक्षा पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून व्यक्त केली.

ही बातमी पण वाचा : …म्हणून पवारांना बारामतीत कोणी हरवू शकत नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER