… तर देश कधीच माफ करणार नाही”; लहान मुलांचा संदर्भ देत मोदी सरकारला या मुख्यमंत्र्याने दिला इशारा

Ashok Gehlot - PM Narendra Modi

जयपूर : वेळेत लसीकरण (Vaccination) झाले नाही तर कोरोनाची (Corona) तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षाही भयंकर असेल, अशी भीती व्यक्त करताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन (Dr. Harshvardhan) आणि केंद्र सरकारला (Central Government) इशारा दिला की – तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात कोरनाचा संसर्ग झाला तर देश कधीच माफ करणार नाही.

गेहलोत यांनी ट्विट केले – “१३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशामध्ये तातडीने सर्वांच्या लसीकरणाची सोय केली नाही आणि करोना तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना संसर्ग झाला तर ऑक्सिजन आणि औषधांच्या कमतरतेमुळे दुसऱ्या लाटेमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यापेक्षा जास्त गंभीर परिस्थिती निर्माण होईल. तिसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढलं तर आपण लहान मुलांना वाचवू शकणार नाही.

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि आरोग्यमंत्र्यांना टॅग केलं आहे – “मोदीजी आणि हर्ष वर्धनजी लसींच्या उत्पदनाला सर्वोच्च प्राधान्य देणं गरजेचे होतं. यासाठी गरज पडल्यास कायद्यात बदल करुन इतर कंपन्यांनाही लसींच्या निर्मितीसंदर्भातील परवानगी देऊन प्रोत्साहन द्यायला हवं होतं. भारत हा जगभरामध्ये लस निर्मितीसाठी आघाडीचा देश मानला जातो.”

तिसऱ्या ट्विटमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सोडून राज्यांना जास्त प्रमाणात लसी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा अशी मागणी गेहलोत यांनी केली. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग झाला तर देश कधीच माफ करणार नाही, असे गेहलोत म्हणालेत.

करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने टास्क फोर्स निर्माण करुन त्यासंदर्भातील उपाययोजनांचे काम केंद्रीय आणि वेगवेगळ्या राज्यांमधील सरकारांनी राज्य स्तरावर सुरु केलं आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button