…तर मुख्यमंत्र्यांची नाचक्की होईल, काँग्रेसने मंत्रिमंडळातून बाहेर पडावं – प्रकाश आंबेडकर

CM Uddhav Thackeray & Prakash Ambedkar

अकोला : काँग्रेस (Congress) नेते आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अनलॉक जाहीर केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ते रद्द केलं. हे अत्यंत चुकीचं असून आपदा व्यवस्थापनाचे निर्णय लागू व्हायला पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी त्यात हस्तक्षेप करणे अत्यंत चुकीचे आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला न पटणारे आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचा हा निर्णय उद्या लागू झाला तर मुख्यमंत्र्यांची नाचक्की होईल, असे मत व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर निशाणा साधला.

प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला मोलाचा सल्ला दिला. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात जर काँग्रेस मंत्र्याचा अपमान होत असेल तर काँग्रेसने मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला. शिवसेनेने सत्तेची फळेही चाखायची आणि भाजपवर टीकाही करायची अशा दोन गोष्टी एकाचवेळी चालणार नाही. यांच्या खेळामध्ये सामान्य भरडला जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button