…तर भंडा-याची दुर्घटना टाळता आली असती – मनसे

Bhandara District Hospital Fire Accident - Raj Thackeray

मुंबई :- महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) ठाकरे सरकारने (Thackeray Government) राजकीय नेत्यांना दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत अनेक नेत्यांची सुरक्षा यंत्रणा कमी केली आहे. यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचाही समावेश आहे. सरकारच्या या निर्णयानंतर मनसेचे नेते सरकारवर संतापले आहेत. चीड व्यक्त करत आहेत.

मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी फेसबुक पोस्ट लिहीत सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. बाळा नांदगांवकरांनी भंडा-यांच्या दुर्घटनेवरूनही सरकारला इशारा दिला आहे. सरकारने जनतेला गृहीत धरू नये, ये पब्लिक है ये सब जानती है, असे म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे;त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार ; मनसे नेत्याचा टोला 

सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील 10 बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती.”

तसेच, बाळा नांदगावकर म्हणाले, “चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे ती नावं बघितल्यास सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा एकच प्रश्न उपस्थित होतो.

एवढेच नाही तर बाला नांदगावकर म्हणाले की, “राज ठाकरे यांच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू त्यांच्याबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु त्यांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही. त्यांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत. सरकार दरबारी जी कामे होत नाही किंवा ज्या विषयांना मतपेटीसाठी टाळले जाते असे अनेक विषय राज दरबारी निकालात निघतात. त्यांच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे “खुजेपण” ठळकपणे दाखविणारा आहे,” असंही नांदगावकरांनी नमूद केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER