… तर शिवसैनिक उत्तर देतील ; चंद्रकांत खैरेंची इम्तियाज जलील यांच्यावर टीका

Chandrakant Khaire - Imtiaz Jaleel

औरंगाबाद : राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मेपर्यंत कडक निर्बध लावण्यात आले. यावरून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यावर सडकून टीका केली. जलील हा दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करतो . जर तो दुकाने उघडायला आला तर शिवसैनिक (Shiv Sena) उत्तर देतील, अशा शब्दात खैरे यांनी जलील यांना खडेबोल सुनावले आहे . खैरे यांच्या या टीकेमुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी औरंगाबादेत महापालिका प्रशासनाकडून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात स्थानिक पातळीवर लॉकडाऊनची घोषणा केली होती. तेव्हा इम्जियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. लॉकडाऊन लागू केला आणि जलील यांनी आंदोलन पुकारलं तर औरंगाबादेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दरम्यान राज्यात लॉकडाऊन (Lockdown) उघडलं तर तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होईल , असेही खैरे म्हणाले . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्याने ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान दुसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्या कमी होत असल्याने ठाकरे सरकारकडून लॉकडाऊन शिथिल केला जाण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button