…तर शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री नक्कीच करतील, चंद्रकांत पाटीलांचा दावा

Chandrakant Patil - Sharad Pawar - Supriya Sule

पुणे : राज्यात गेल्यावर्षी अजित पवार (Ajit Pawar) यांना हाताशी धरून भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला काल एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकासघाडीतील नेत्यांनी या आठवणींना उजाळा देत एकप्रकारे भाजप नेत्यांच्या जखमेवर मीठ चोळले. मात्र यावर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर शरद पवार (Sharad Pawar) अजितदादांना नाही तर सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) मुख्यमंत्री करतील असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सांगलीतल्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले आहे “सध्या अजित पवार त्यांचे काका शरद पवार यांच्याबद्दल गोडवे गात आहेत. मात्र,आता कितीही गोडवे गायले तरीही गेल्या वर्षी तीन दिवसांसाठी का होईना अजितदादांना काकांना सोडले होते हा इतिहास आहे. भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर शरद पवार हे अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ही दरबारी लोकांची पार्टी आहे. भाजप हा सामान्य माणसाचा पक्ष आहे. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी मी कोथरूडला अडकलो होतो. त्यामुळे इस्लामपुरात पुरेसे लक्ष देता आले नाही. आमच्यात मतभेद नसते तर इस्लामपूरात जयंत पाटील यांची सुट्टी केली असती. मग ते राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते राहिले असते. आता आगामी निवडणुकीत पाहूच, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER