…तर विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडू; मुनगंटीवार यांचा इशारा

Sudhir Mungantiwar - Uddhav Thackeray

मुंबई : माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळांबाबत राज्यपालांशी सविस्तर चर्चा केली. दोन्ही वैधानिक विकास महामंडाळांचा कालावधी ३० एप्रिल २०२० ला संपुष्टात आला आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी हे महामंडळ आवश्यक आहे.

त्यामुळे सरकारनं ऐकलं नाही तर याद राखा. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशाराच मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Goverment) देऊन टाकला. १२ आमदारांच्या नियुक्तीवरून ठाकरे सरकार राज्यपालांशी उघडपणे संघर्ष करताना दिसत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या विभागांचा असमतोल विकास करायचा आणि तिजोरीवर डाका टाकायचा, सरकारमध्ये सध्या हेच सुरू असल्याचा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केला. विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. इतकेच नाही तर विधानसभेत याबाबत हक्कभंग मांडणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय पक्षाचे नेते घेतील. विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद देण्याचे संकेत आहेत. ते पाळण्याविषयी सरकार काहीच बोलत नाही. एक पाऊल त्यांनी चालावे, एक पाऊल विरोधी पक्षाने पुढे यावे. तुम्ही उमेदवार उभा करू नका आणि आमची हेकड भूमिका, असं चालणार नसल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय. हा कोरोना एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वेगाने रंग बदलतोय, अशी मिस्कील  टिप्पणी मुनगंटीवारांनी केली. प्रदेशाध्यक्षांची मिरवणूक असेल तर कोरोना नाही.

मात्र अधिवेशन असेल तर कोरोना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी कोरोना आहे. अधिवेशनाची वेळ आली की सरकारमधील मंत्री लगेच कोरोनाला सामोरे करतात, असं सांगतात आणि लॉकडाऊनची भाषा करू  लागतात, असा जोरदार टोलाही मुनगंटीवार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांना आणि मंत्र्यांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER