तेंव्हा लोक म्हणायचे, “रामाच्या काळजात डोकावलं तर सीता दिसेल आणि नेहरुंच्या काळजात एडवीना”

Maharashtra Today

१९४७ वर्ष उजाडलं. ब्रिटनमध्ये लेबर पार्टीच (Labor Party) सरकार आलं होतं. लॉर्ड माउंटबॅटन रेलक्लिफ (Lord Mountbatten Railcliffe)यांच्या सोबतीनं भारताच्या नकाशाच्या सीमा ठरवतं होते. पंजाब आणि पुर्व बंगाल दंगलिच्या आगित जळत होते. गांधी एकटेच या दंगलिची आग शांत करण्याच्या प्रयत्नात होते. पटेलांनी संपूर्ण भारतातील राजा- महाराजांची मन वळवूण त्यांना भारतात सामील करण्याच्या प्रयत्नात होते. अशा परिस्थीती दोन लोकांना प्रेम आकर्षित करत होतं. पहिला व्यक्ती स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान बनणार होता त्यांच्या प्रेमात माउंट बॅटनयांची पत्नी होती. त्यावेळी नेहरु(Nehru) ५८ वर्षांचे होते आणि एडवीनाा (Edwina) ४७ वर्षांच्या.

कमला नेहरु त्यांच्या पत्नी होत्या पण देश सांभाळणाऱ्या नेहरुंना लग्न टिकवता आलं नाही. नेहरुंनी अनेकदा या गोष्टीची कबूली दिलीये. कमला एक साधी सरळ काश्मिरी मुलगी होती. नेहरुंनी सात वर्ष लंडनमध्ये काढली होती. उच्च दर्जाचं शिक्षण, दिमाखदार राहणीमान आणि स्वतंत्र आयुष्य त्यांनी जगलं होतं.

माउंट बॅटन (Mount Baton) जेव्हा भारतात येणार होते तेव्हा त्यांच्या पत्नीला भारतात यायचं नव्हतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. माउंट बॅटन यांची पत्नी एडवीनाानं याआधी ब्रिटनच्या वर्तमान पत्रांचे मथळे तिच्या इतर ही संबंधामुळं झळकावले होते.पंडीत नेहरुंचं व्यक्तीमत्व माउंट बॅटन आणि त्यांच्या पत्नी एडवीनाा या दोघांना आवडायचं. आणि याचाच फायदा काश्मिर मुद्यात झाला. जेव्हा फाळणीच्या सीमा काश्मिरला येऊन धडकल्या तेव्हा. या प्रकरणात एडवीनाा यांचा मोठा सहभाग होता. मॉर्नन जेनेटनं ‘एडवीनाा माउंट बॅटन: अ लाइफ ऑफ हर ओन’ या पुस्तकात या संबंधी अनेक खुलासे केलेत.

नेहरु आणि एडवीनााबद्दल यांच्याबद्दल माउंट बॅटन यांच मत त्यांनी मुलीला लिहलेल्या पत्रात सापडतं. माउंट बॅटन लिहतात, ” तु ही गोष्ट कुणाला बोलू नकोस पण ही गोष्ट खरी आहे की नेहरु आणि एडवीनाा एकमेकांसोबत खुप सुंदर दिसतात. ते दोघे एकमेकांबद्दलचा स्नेह व्यक्त करत असतात. आणि आणि पामेला (माउंट बॅटन यांची दुसरी मुलगी) हे पाहतोय. तुझी आई या काही दिवसात खुप खुश आहे.”

माउंट बॅटन यांनी त्यांच नातं टिकवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. दरवेळेला जेव्हा त्यांची पत्नी एडवीनाा सोडचिठ्ठीशी भाषा बोलायची तेव्हा ते मधला मार्ग काढत. त्यामुळंच त्यांच लग्न इतकी वर्ष टिकलं होतं. एडवीनाा सोबत त्यांच्या लग्नामुळं त्यांना अनेक ठिकाणी प्रगतीच्या वाटा मिळाल्या. नेहरु आणि एडवीनाा यांच्या प्रेमाचे किस्से एलेक्स वॉन तुन्जेलेमन यांच्या ‘द इंडीयन समर’ या पुस्तकातही आढळतात. सुरुवातीला पत्र व्यवहारातून सुरु झालेलं त्यांच नात पुढं रोजच्या भेटीत बदललं. नेहरु जिथेही असत एडवीनाासाठी नेहमी गिफ्ट खरेदी करायचे.

नेहरुंच्या या नात्यामुळं त्यांना मोठ्या संघर्षाला तोंड द्याव लागलं. त्यांचं राजकिय जीवन उधवस्त होण्याच्या मार्गावर होतं. यावेळी एडवीनाा यांनी नेहरुंना कर्तव्यांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. हा सल्ला नेहरुंना सुरुवातली पटला नाही पण त्यांनी अमंल करण्याचा निर्णय घेतला. माउंट बॅटन ज्यादिवशी भारत सोडून जाणार होते, त्याच्या आदल्या दिवशी मोठ्या दावतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नेहरुंनी केलेल्या भाषणात त्यांच एडवीना यांच्यावरचं प्रेम साफ साफ जाहीर होतं. नेहरु भाषणात म्हणाले होते, “ईश्वरानं किंवा एखाद्या अप्सरेनं तुम्हा सौंदर्य, बुद्धीमत्ता, सौम्यता, आकर्षण आणि उर्जा दिलीये. फक्त हेच नाही. यासोबत तुम्हाला एक खास गोष्ट मिळालीये कमालीची मानवी उर्जा. लोकांप्रती सेवाभाव. या सर्व गोष्टींच्या संमिश्र प्रभावानं तुमच्या सारखी प्रतिभावंत महिला बनते. ..” हे भाषण ऐकल्यानंतर एडवीना यांना रडू कोसळलं.

२१ जुलै १९४८ च्या दिवशी एडवीना आणि लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारताचा निरोप घेतला. यानंतर एडवीना अनेकदा भारतात आल्या होत्या. नेहरु ब्रिटनला गेले होते तेव्हा त्यांनी एडवीना यांची भेट घेतली होती ते माउंट बॅटन यांच्या घरी गेले होते. एकदा त्या नेहरुंसोबत नेनीतालला गेल्या होत्या. एके ठिकाणी दोघे थांबले होते. टाटा स्टीलचे होणारे चेअरमन रुसी मोदी जेव्हा त्यांना भोजनासाठी बोलवायला गेले तेव्हा दोघे एकमेकांच्या मीठीत होते. हा किस्सा भारतभर वणव्यासारखा पसरला तेंव्हा लोक म्हणायचे. “रामाच्या काळजात डोकावलं तर सीता दिसेल आणि नेहरुंचा काळजात डोकावलं तर एडवीना.”

त्यांच्या या नात्याचा फायदा उचलण्याचा अनेकांनी प्रयत्न केला होता. भारतापासून वेगळ्या पाकिस्तानची वेगळी मागणी करणारे मोहम्मद अली जिन्नांचं नाव ही या यादीत सामील आहे. काश्मिर मुद्द्यावर नेहरु हटून बसले होते. कोणत्याही परिस्थीतीत त्यांना काश्मिर पाकिस्तानला द्यायचा नव्हता. अशावेळी माउंट बॅटन यांनी एडवीनला सांगून नेहरुंना काश्मिर पाकिस्तानला द्यायला राजी करावं, अशी मागणी जिन्ना यांनी लॉर्ड माउंट बॅटन यांनी केली होती. माउंट बॅटन यांनी ही मागणी धुडकाऊन लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER