…तर नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; वरुण सरदेसाईंचा इशारा

Varun sardesai - Nitesh Rane-Maharastra Today

मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेली गाडीच्या प्रकरणात थेट वरुण सरदेसाईंवर गंभीर आरोप केले आहेत. वाझेंनी सट्टेबाजांना पैशांसाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आमचे काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही? अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस वरुण सरदेसाई आहे, असा गंभीर आरोप राणेंनी केला होता. त्याला आता युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे. मला राजकारणाची आवड आहे.

पण आज जे आरोप केले तसे काम माझ्याकडून घडणारही नाही, असंही स्पष्टीकरण वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी दिलं. यावेळी सरदेसाई म्हणाले की, राणेंवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे म्हणजेच मर्डर, अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत, खुद्द फडणवीसांनीच हे विधानसभेत एकेकाळी मांडले आहेत. आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत सुटले आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही. मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी जे आरोप केले, ते सिद्ध करावेत, नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत.

ते सगळे आरोप खोटे असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असंही वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलं. आपण सगळे मला युवासेनेचा सचिव म्हणून ओळखता. त्याच्या आधीची मी माझी पार्श्वभूमी सांगतो. दहावीत मला ९१ टक्के गुण मिळाले. त्यानंतर बारावीत मला डिस्टिन्क्शन मिळालं. त्यानंतर मुंबई विद्यापीठात मी सिव्हिल इंजिनीअरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या अशा जगातील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात मी मास्टर्स इन सिव्हिल इंजिनीअरची पदवी मिळवली. ही पदवी अगदी एका वर्षात मिळवली. मी ते करून परत आलो. माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे.

युवा सेनेत काम करत असताना मी युवा सेनेत काम करतो. माझे वडील मॅकेनिल इंजिनीअर आहेत. त्याचबरोबर माझे आजोबाही इंजिनीअर आहेत. मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे काम माझ्याकडून घडणारही नाही, असंही वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER