…तर एका दिवसाच्या पावसाने मुंबईची तुंबई झाली नसती; दरेकरांचे पेडणेकरांना प्रत्युत्तर

Pravin Darekar - Kishori Pednekar

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात (काल) पर्यावरणदिनी झालेल्या वृक्षतोडीवरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल झाली. हा कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार असल्याचे म्हणत थेट मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.

ती झुडपे होती. त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने कापण्यात आली, असे स्पष्टीकरण पेडणेकर यांनी दिले होते. मात्र पेडणेकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर आता परत दरेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून टीकास्त्र सोडले आहे. छोट्या झुडपांचंच रूपांतर मोठ्या वृक्षात होत असतं, मोठी झाडं काही आभाळातून पडत नाहीत. ही झुडपं नव्हती, पाच-सात वर्षांची झाडं होती. काम कसं करायचं हे समजलं असतं तर एका दिवसाच्या पावसानं मुंबईची तुंबई झाली नसती किंवा २५ वर्षांत झोपडपट्ट्या शौचालयाविना राहिल्या नसत्या. छोटी झुडपं छाटून टाकली आहेत, हे महापौर किशोरी पेडणेकर यांचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आणि घटनेचं गांभीर्य कमी करणारं आहे.

निवडणुकीच्या आधी विरोधकांनी दुर्बीण लावून शोधलेली ही घटना नाही आहे. दक्ष माध्यमांनी आणि सामान्य मुंबईकरांनी लक्षात आणून दिलेली घटना आहे. कृपया, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याऐवजी महापालिकेनं काम सुधारलं पाहिजे, असे म्हणत दरेकर यांनी टीकास्त्र सोडले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button