…तर तिसरा उपमुख्यमंत्री अपक्षांना दिला पाहिजे – बच्चू कडू

Bachchu Kadu

अहमदनगर : आज काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर आता झिरवळ यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद असणार आहे.

पुढील प्रदेशाध्यक्ष हे अधिक आक्रमक असावेत यासाठी काँग्रेसच्या कमिटीचा आग्रह असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेसला आता उपमुख्यमंत्री पदाबाबत रस असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. यामुळे आजच्या दिवसभरात राजकीय हालचालींना वेग आल्याचे देखील दिसून आलं आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे याला सहमती देणार का ? हे देखील महत्वाचं ठरणार आहे. तसं झाल्यास राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदाच्या जागा निर्माण होतील. यावर राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाष्य केलं आहे. बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमधील सत्तेत सहभागी आहेत. ‘दोन उपमुख्यमंत्री होणार नाही. जर असे झाले तर तिसरा उपमुख्यमंत्री अपक्षांना दिला पाहिजे’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER