…तर लॉकडाऊन करावे लागेल; छगन भुजबळ यांचा इशारा

Chhagan Bhujbal-lockdown

नाशिक : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सर्वांना कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. आज छगन भुजबळ यांनी शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी पंचवटी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत  लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात अद्याप निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊन करणे नागरिकांना आणि शासनाला परवडणार नाही. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली  तर यावर निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय नागरिकांच्या हातात आहे. जर नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करून मास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला, तरच हे शक्य आहे. अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागणार, असे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनासाठी महिना बाकी आहे. संमेलनाच्या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील. कार्यक्रमस्थळी मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या ठिकाणी गर्दी होणार नाही, याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लग्न समारंभावर निर्बंध

दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लग्नसोहळ्यांवर परत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे लग्नाला फक्त १०० लोक उपस्थित राहू शकणार. याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेश जारी केले आहेत. तसेच आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER