‘… तर राज्यपालांना भेटण्याचा योग आला नसता !’ उद्धव ठाकरेंचा पलटवार

Governor Bhagat Singh Koshyari - Uddhav Thackeray Meets - Maharashtra Today

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केल्यानंतर जोरदार राजकारणाला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती महोदयांना लिहिलेले पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केले.

राष्ट्रपतींना पत्र, पंतप्रधानांची घेणार भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतली. गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याबाबत राज्यपालांना भेट दिली. आरक्षणाचा अधिकार राज्याचा नाही तर केंद्राचा आहे, असे निकालात म्हटले आहे. राज्यपालांनी आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहचवू , असे सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात आज राज्यपालांना पत्र दिले, तसेच पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांनाही पत्र देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “आम्ही बोललो होतो, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करू, ती आम्ही राज्यपालांच्या माध्यमातून केली आहे. मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला. या समाजाच्या मागणीविरोधात कोणताही पक्ष नाही. जो काही समजूतदारपणा दाखवला आहे, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. ही लढाई सरकारविरोधात नाही, सरकार मराठा समाजाच्या सोबत आहे.” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

फडणवीसांचा कायदा टिकला असता तर…
देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर राज्यपालांना भेटण्याचा योग आला नसता. भाजपलाही हा निर्णय लवकरात लवकर अपेक्षित असायला काही हरकत नाही. आज आम्ही राज्यपालांना पत्र दिले आहे, यावर काय उत्तर येणार याची प्रतीक्षा जनतेला आहे. राज्यपालही सहमत आहेत. त्यांनी पत्र वेळेत पोहचवण्याचे आश्वासन दिले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button