…तर कोकणच्या आमदाराबरोबर आंदोलन पुन्हा सुरू करेन; प्रवीण दरेकरांचा इशारा

CM Uddhav Thackeray - Pravin Darekar

मुंबई : भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर (Thackeray Goverment) टीका केली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे कोकोनवासीयांना मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळग्रस्तांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर दरेकरांनी ताशेरे ओढले आहेत. केवळ मदत करायची म्हणून केली आहे. अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत, अशी टीका दरेकरांनी केली आहे.

निसर्ग वादळपेक्षा जास्त नुकसान झाले असा म्हणतात. मग वाढीव दराने मदत केली कस म्हणता? असा सवाल दरेकरांनी सरकारला केला आहे. पंचनाम्यात १२-१५ लाख करता आणि मदत १५ हजाराची देतात. ठाकरे सरकारला कुठलीच कीव नाही. मच्छीमार बांधवांना आणि घरगुती उद्योग करणाऱ्यांना खूप नुकसान झाले आहे. मी मंत्रालयाच्या दारावर आंदोलन करणार होतो. ठाकरे सरकार कसले वाढीव दर म्हणताहेत, असे दरेकर परिषदेत म्हणाले.

“केंद्र २ हजार कोटींची मदत द्या म्हणाले, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मग २५२ कोटी राज्याने कसे ठरवले. ४७ कोटींचा अहवाल दाखवला. एनडीआरएफ ७२ कोटी म्हणत आहे. मग २५२ कोटी कुठून आले. हे पंचनामे फसवे आहे. सरकारने कृषी विद्यापीठामार्फत अभ्यास केला पाहिजे. तसेच ही मदत तरी लोकांच्या हाती पडावी, नाहीतर कोकणच्या आमदाराबरोबर मी थांबलेली आंदोलन पुन्हा सुरू करेन, अशा इशारा दरेकरांनी सरकारला दिला आहे. निसर्ग वादळाची मदत लोकांपर्यंत पोहोचली नाही, परंतु, याबाबतीत तसं होऊ नये, ” असे दरेकर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button