…तर दिल्लीत परिवर्तन होणार; बॅनर्जींचा पंतप्रधानांवर पलटवार

PM Narendra Modi - Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका (West Bengal Elections) येत्या काही दिवसांत पार पडणार आहेत. यासाठी भाजपाने (BJP) पूर्णपणे जोर लावण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसकडूनही (Trinamool Congress) आपला गड राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी कोलकात्यातील ब्रिगेड मैदानात सभेला संबोधित केले. मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर निशाणा साधला. तर बॅनर्जी यांनी सिलिगुडीमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात पदयात्रा काढली. यात त्यांनी मोदींवर पलटवार केला. पंतप्रधान मोठमोठ्या गोष्टी करतात. बंगालमध्ये परिवर्तन होणार, असे म्हणतात. परंतु खरे परिवर्तन तर दिल्लीत होणार आहे, असे म्हणत बॅनर्जींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

“परिवर्तन आता बंगालमध्ये नाही तर दिल्लीत होणार आहे. ते म्हणतात बंगालमध्ये महिला सुरक्षा नाही. परंतु उत्तरप्रदेश, बिहार आणि अन्य राज्यांकडे पाहा. बंगालमध्ये महिला सुरक्षितच आहेत. मी वन-ऑन-वन खेळण्यासाठी तयार आहे. जर त्यांना मते खरेदी करायची असतील, तर पैसे घ्या आणि तृणमूल काँग्रेसला आपले मत द्या.” असेदेखील ममता बॅनर्जी म्हणाल्या. केंद्र सरकार सर्वकाही विकत असल्याचाही आरोप केला.

“केंद्र सरकारने दिल्ली विकली, डिफेन्स, एअर इंडिया, बीएसएनएल अशा अनेक संस्थांना विकले. उद्या जाऊन ते ताजमहलही विकेल. ते सोनार बांगला बनवू असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरील स्टेडियमही त्यांनी आपल्या नावे करून घेतले. कोरोना काळात मी फिरत होते; पण मोदी कुठे होते? देशात एकच सिंडिकेट आहे आणि ते म्हणजे मोदी व अमित शहा… हे सिंडिकेट भाजपाचेही ऐकत नाहीत. उज्ज्वला योजनेवर कॅगने ठपका ठेवला आणि त्यात गैरव्यवहार झाल्याचे सांगितले.” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER