…तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता; चाकणकर यांची प्रतिक्रिया

Maharashtra Today

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले, असे झाले नसते तर दीपाली चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली चाकणकर यांनी केले. दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती. कदाचित आवाज उठवला असता, तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, असे चाकणकर म्हणाल्या.

“जेव्हा दीपाली चव्हाण (Deepali Chavan) यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली, तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता, तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो.” असे चाकणकर यांनी ट्विट केले आहे.

दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत नवनीत राणा यांना कोंडीत पकडले आहे. तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का, असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER