… तर काँग्रेसला मिळू शकते उपमुख्यमंत्रीपद

Mahavikas Aghadi

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांच्या जागी शिवसेनेला (Shiv Sena) विधानसभा अध्यक्षपद देण्यास तयार आहे व याच्या बदली शिवसेना काँग्रेसला उपमुख्यमंत्री देईल. याला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) आक्षेप नसल्याने फार्मुला तडीस जाण्यात अडचण नाही.

सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद आहे. राजकीय सूत्रांचा माहितीनुसार दुसरे उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तर काँग्रेस हे पद शिवसेनेला देण्यास तयार आहे. त्याबदलत्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे तुलनेने महत्त्वाची पदं आहेत. त्यामुळे आता काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे.

शिवसेनेचा फायदा

काँग्रेसच्या या प्रस्तावाला शिवसेनेही अनुकूलता दर्शवल्याचे कळते. शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळणार असेल, तर सेनेसाठी ते फायद्याचे आहे. विधानसभा अध्यक्षपद घ्या आणि उपमुख्यमंत्रिपद द्या अशी काँग्रेसची भूमिका आहे.

शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात ही पदांबाबत चर्चा होत असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्याच्या सरकारमधील तिन्ही पक्षांमधील महत्त्वाचा दुवा आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचा हा प्रस्ताव मान्य करण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीही एखाद्या पदावर दावा सांगू शकते, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER