Sachin Vaze : …तर मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही; निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

Nilesh Rane criticizes CM Uddhav Thackeray

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओमध्ये स्फोटके सापडली. या प्रकरणी एनआयएने काल रात्री पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केली. पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणात सचिन वाझेंचा बचाव करणाऱ्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांची कोंडी झाली आहे. यात आता भाजपा अधिकच आक्रमक झाली आहे. सचिन वाझे हे लादेन आहेत का? असे विचारणारे मुख्यमंत्री कुठे आहेत, असा सवाल भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला.

निलेश राणे यांनी ट्विट केले की, “वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत??? आतंकवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलीस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले, तर अशा मुख्यमंत्र्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा.” अशी मागणी निलेश राणे यांनी केली.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणावरून विधानसभेत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणात सचिन वाझे यांची काल ‘एनआयए’ने दिवसभर चौकशी केली आणि रात्री त्यांना अटक केली. आज वाझे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ मार्चपर्यंत ‘एनआयए’ कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले असल्याची माहिती भाजपाचे नेते नारायण राणे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER