…तर भाजप खासदार मेनका गांधी आज कॉंग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्या असत्या!

Menka gandhi - Maharastra Today
Menka gandhi - Maharastra Today

भारतीय राजकारणावर नेहरु- गांधी घराण्याचा मोठ्या कालावधीसाठी एकछत्री अंमल राहिलाय. खुर्चीसाठी चालेल्या सत्तासंघर्षाप्रमाण या घरात घरगुती वादही नंतरच्या काळात उफाळून आले. अशाच एका वादाची कहाणी आहे जी फार कुणाला माहिती नाही. गांधी घराण्याला दोन हिस्स्यात तोडणारी ही काहणी. मेनका आणि संजय गांधींच्या प्रेमकहाणीचं रुपांतर विवाहात झालं आणि संजय गांधींच्या मृत्यूनंतर मेनकांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला होता. असं का झालं होतं?

मेनका आणि संजय गांधींची लव्ह स्टोरी

दिल्लीत २६ ऑगस्ट १९५६ साली मेनका गांधी (Maneka Gandhi) यांचा जन्म झाला. लॉरेंस स्कूलमधून त्यांनी शिक्षण पुर्ण केलं. यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी लेडी श्रीराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९७३ साली या कॉलेजमध्ये ‘मिसलेडी’ नावची स्पर्धा भरवण्यात आली. मेनका यांनी ही स्पर्धा जिंकली. यानंतर त्यांच्याकडे अनेक मॉडलिंग कंपन्यां कामासाठी प्रस्ताव घेऊन येऊ लागल्या. यातच ‘डेल्ही क्लास मिल’ नावच्या कापड कंपनीनं फॅक्ट्रीच्या जाहिराती साठी एक ‘बोल्ड’ जाहिरात बनवली. जिचे बोर्ड दिल्ली शहरातल्या काना कोपऱ्यात लागले होते.

या जाहिराती बघूनच संजय गांधी मेनका यांच्याकडे आकर्षित झाल्याचं बोललं जातं. त्यावेळी संजय गांधी ममताची चुलत बहिण वीनू कपूरचे मित्र होते. वीनू कपुरच्या लग्नावेळी मेनका आणि संजय गांधी यांची भेट झाली. दोघांची त्यादिवशी चांगली मैत्री झाली. संपूर्ण संध्याकाळ ते एकमेकांसोबत होते. यानंतर भेटीगाठी वाढत राहिल्या. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दरम्यान संजय गांधी यांच एक छोटं ऑपरेशन झालं होतं. मेनका रोज कॉलेजनंतर संजय गांधींना भेटायला जात होत्या. दोघांच्यात दिवसेंदिवस प्रेम वाढत गेलं. शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. संजय गांधींनी मेनक यांच्या वडीलांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. संजय गांधी मेनका गांधींपेक्षा ११ वर्षांनी मोठे होते.

लग्न आणि मृत्यू

इंदिरा गांधींपर्यंत ही गोष्ट पोहचली. इंदिरांनीा मेनकांना घरी भेटायला बोलावलं. काही प्रश्न त्यांनी या वेळी मेनका यांना विचारले. यानंतरच त्यांनी लग्नाला होकार दिला. शेवटी २९ सप्टेंबर १९७४ ला दोघांच लग्न झालं. या लग्नापासून माध्यमांना दुर ठेवण्यात आलं. इंदिरांनी या लग्नासाठी मेनका यांना २१ साड्या, दागिने, नेहरुंनी तुरुंगात असताना विणलेली साडी भेट दिली होती. हे लग्न जास्त दिवस टिकणार नाही असा अंदाज अनेकांचा होता. परंतू हे अंदाज दोघांनी खोटे ठरवले. त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव ‘वरुण गांधी.’

लग्नानंतर खऱ्या वादाला सुरुवात झाली संजय गांधींच्या मृत्यूनंतर. १९८०मध्ये एका हवाई दुर्घटनेत संजय गांधी यांचा मृत्यू झाला. इंदिरा यांना शंका होती की मेनक गांधींची आई मेनका यांना राष्ट्रीय राजकारणात सहभाग घेण्याचा सल्ला देईल. संजय गांधी इंदिरा गांधींचे सर्व काम सांभाळत होते. आणीबाणी वेळी संजय गांधी यांनीच अनेक मोर्च्यांवर नेतृत्त्व केलं. संजय गांधी यांनाच इंदिरांचा राजकीय वारस मानलं जायचं. संजय गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधींनी राष्ट्रीय राजकारण हातात घ्यावं अशी इंदिरांची इच्छा होती परंतू वेळ बदलत होती. मेनका गांधींच्या मनात राष्ट्रीय राजकारण हातात घेण्याची इच्छा बळ धरु लागली.

इंदिरा आणि मेनका यांच्यात वादाची ठिणगी

गांधी परिवाराच्या निटकवर्ती मानल्या जाणाऱ्या लेखक आणि पत्रकार खुशवंत सिंग यांनी लेख लिहित मेनका गांधी यांच्या समर्थनार्थ लेख लिहला. याला कारण होतं राजीव गांधींना राजकारणात यायचं नव्हतं तर मेनकांनी संजय गांधींसोबत काम केलं होतं. या लेखात मेनका यांना सिंहावर बसलेली दुर्गा असं दाखवण्यात आलं होतं. यामुळं इंदिरा गांधी नाराज झाल्या. याआधी १९७१च्या युद्धानंतर ‘दुर्गा’ ही उपाधी इंदिरा गांधींना मिळाली होती. आता एकाच घरात दोन दुर्गा तयार होत्या. वाद होणं अटळ होतं.

सासू सुनेत वादाला सुरुवात झाली. यानंतर १९८२ला लखनऊमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली. या सभेला इंदिरा गांधींनी पक्षाच्या विरोधात असल्याचं मत मांडलं. त्यावेळी आयोजकांनी मेनका यांना आमंत्रित केलं होतं. या सभेत भाषण करु नका,असा सल्ला इंदिरांनी मेनका यांना दिला होता. पंरतू मेनका यांनी सभेला संबोधित केलं. पुढच्याच दिवशी मेनका यांनी घर सोडून निघून जावं असा आदेश इंदिरांनी दिला. मेनकांनी इंदिरांनी घरातून हकललं. मेनकांनी घर सोडलं. पुढं त्यांनी संजय गांधी विचार मंचची स्थापना केली. नंतर जनता दलात त्यांनी प्रवेश केला. मोदी सरकारात त्या महिला आणि बालकल्याण मंत्री होत्या. वरुण गांधींना उत्तरप्रदेशातला महत्त्वाचा भाजपचा नेता मानलं जातं.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button